SUCCESS MANTRA
मित्रांनो, मी तुम्हाला आज एक आवाहन करतो, तुम्ही जे कोणी असाल, विद्यार्थी असाल, नोकरी करत असाल, किंवा उद्योजक असाल;खालील तक्ता लक्षपूर्वक वाचा आणि त्यानुसार कृती करायला शिका
उद्योगातील यशासाठी बाधक विचार
* उद्योग सुरू करून काही उपयोग नाही उगाचच नको ते तणाव, रोजची नवीन आव्हानं.
* मी अनेकवेळा व्यवसाय करून पाहिला पण मी अपयशीच ठरतो.
* हे उत्पादन चालणार नाही, खूप मोठय़ा कंपन्या हे उत्पादन तयार करतात. माझा निभाव लागणार नाही.
हा उद्योग माझ्या योग्यतेचा नाही. मी हे करणं कमीपणाचं ठरेल.
उद्योगातील यशासाठी साधक विचार
*उद्योग सुरू केला तर नक्कीच फायदा होईल आव्हानांतूनच माणूस घडतो.
*व्यवसायात अपयशी होण्यामागे माझीच चूक आहे. पूर्वनियोजन आणि अभ्यास यामध्ये मी कमी पडलो पण पुन्हा नव्या दमाने सुरुवात करेन.
*माझं उत्पादन नक्कीच बाजारात विकलं जाईल. मोठय़ा कंपन्या जरी बाजारात असल्या तरी माझं उत्पादन मी उत्कृष्ट बनवून ते विकण्यासाठी विक्रीच्या उत्तम योजना तयार करेन.
*कुठलाही उद्योग लहान किंवा मोठा नसतो. माझा माझ्या उद्योगाबद्दलचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. हा उद्योग जरी लहान वाटत असेल तरी मी माझ्या कृतीतून तो मोठा करेन.
जेव्हा तुम्ही एखादा उद्योग निश्चित कराल तेव्हा खालील पायऱ्यांचा विचार करा :
० तुम्हाला नेमका कोणता उद्योग करायचा आहे आणि त्यातून किती उत्पन्न मिळवायचे आहे. म्हणजेच तुमच्या मिळकतीचा आकडा निश्चित करा. मला खूप फायदा मिळवायचा आहे हे निश्चित उद्दिष्ट होऊ शकत नाही. म्हणजे मला ५ लाख, १० लाख, १५ लाख कमवायचे आहेत.
० हे ५ लाख, १० लाख तुम्हाला किती कालावधीमध्ये हवे आहेत. (एक वर्षांत, २ वर्षांत की ५ वर्षांत)
० हे उद्दिष्ट तुम्ही ठरवलेल्या कालावधीत तुम्हाला मिळवायचं असेल तर त्याचे निश्चित प्लॅन, ठोस योजना तयार करा आणि त्याप्रमाणे कामाचा श्रीगणेशा करा. हे असं करू की नको असे विचारमंथन करण्यात वेळ दवडू नका.
० तुमचं उद्योगाचं उद्दिष्ट, ते मिळविण्याचा कालावधी हे एका डायरीत लिहा आणि हे लिहिलेलं सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपल्यावर मोठय़ाने वाचा.
० माझा उद्योग यशस्वी होणार, माझं निश्चित उद्दिष्ट मी प्राप्त करेन आणि मी अपेक्षित केलेली मिळकत मला मिळाली आहे अशी कल्पना करा. हा स्वयंसूचनेचा एक भाग आहे. त्यामुळे लवकरच तुम्हाला तुमचं उद्दिष्ट प्राप्त करता येईल.
उद्योग, व्यवसाय म्हटला, की त्याला तीन प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते -
१) पैशाचे भांडवल, २) वेळेचे भांडवल, ३) मनुष्यबळाचे भांडवल.
अनेक जणांकडे पैशांचे भांडवल उपलब्ध नसते; पण त्यामुळे काळजी करू नये.कोणत्याही अडचणीतून मार्ग आहे हे सारे येत्या ६ मार्च २०११ तारखेला सातारा मध्ये कार्यक्रम आहे सर्वांच्या साठी मोफत ठेवण्यात आलेला आहे या माहितीसाठी व पास मिळण्यासाठी संपर्क करा 9850646316 पास मर्यादित आहेत.
Submitted by D S K GROUP REAL ESTATE SATARA on March 3, 2011 at 20:10